आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहींना उणी-दुणी काढण्याची सवय:देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले - सर्वांना एकत्रित करण्यासाठी संमेलन; उच्च शिक्षण मराठीतून देणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी टिकेल का विचारणाऱ्याला आपण मराठीसाठी काही करणार का असा सवाल करायला हवे असे म्हणताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यत गेले पाहिजे. काहींना केवळ काहींना उणी-दुणी काढण्याची सवय असल्याचा टोला ही देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले की भारतीय भाषा या जर आपल्याला जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञान राशीमध्ये बदल करावा लागेल असे म्हणत आता सर्व शिक्षण मातृभाषेत देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाषा वैश्विक करणार

उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेत शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आपच्या भाषा या वैश्विक भाषा होऊ शकणार नाही. हे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हेरले आणि त्यांनी तसे करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे सर्व राज्यांनी आपल्या भाषेत नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू करत सर्व शिक्षण मराठीतून देणार आहोत. मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व मराठी संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.

मराठी तितुका मेळवावा - विश्व मराठी संमेलन उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे,आमदार आशीष शेलार आमदार यामिनी जाधव , मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित आहेत

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी तितुका मेळवावा - विश्व मराठी संमेलन - 2023 या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

विश्व मराठी संमेलनाची नावनोंदणी इंग्रजीत

मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची नावनोंदणी इंग्रजी भाषेत करावी लागत आहे. संमेलनात सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या लोकांना मराठी भाषा विभागातर्फे एक लिंक पाठवण्यात आली आहे. त्यावर संबंधितांना आपले नाव, ईमेल आणि अन्य तपशील इंग्रजी भाषेत भरावा लागत आहे. यामुळे मराठी भाषेला प्रोत्साहन देताना इंग्रजीचा वापर करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...