आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एकीकडे प्रकल्प जात असताना आणि शिंदे भाजप सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात कुरघोड्या आणि आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. नागपूरचे नागपूरला होणाऱ्या प्रकल्पाबाबत मविआ सरकारने त्रुटी दुर केल्या नव्हत्या. त्यामुळे या प्रकल्पांची मंजुरी रखडली होती असा आरोप त्यांनी केला. आज ते माध्यमांशी बोलत होते.
मेट्रो फेज 2 ला मान्यता
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाग नदीचे शुद्धीकरण आणि पुनर्विकास प्रोजेक्ट दोन हजार कोटींचा आहे. जायका त्याला फंडींग करणार आहे. यासह मेट्रो फेज 2 लाही मान्यता मिळाली आहे. पंतप्रधानांमुळे नागपूरला हे प्रोजेक्ट येत आहेत.
आम्ही त्रुटी दुर केल्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीने नागपुरातील प्रोजेक्टमध्ये असलेल्या त्रुटी दुर केल्या नाही. आमचे सरकार आल्यानंतर 25 दिवसांत त्रुटी दुर केल्या आणि आता केंद्राने मंजुरीही दिली.
कायद्याआधी पडताळणी
देवेंद्र फडणवीस म्हणाले,महाविकास आघाडीचे खासदार कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावर गृहमंत्र्यांना भेटले चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी कोणीही भेटले तर ते उत्तमच आहे. लव्ह जिहादबाबत आम्ही पडताळणी करीत आहोत. कोणताही निर्णय घेतला नाही. वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत काय निर्णय घेतला हे आम्ही पाहत आहोत.
'समृद्धी' मोदींची भेट
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींचा दौरा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची भेट म्हणून महाराष्ट्राला देत आहे. यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचे भाग्य बदलणार आहे. या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. याशिवाय काही कार्यक्रमही पंतप्रधान आपल्या दौऱ्यात करतील.
जास्त दिवस बाहेर ठेवू नका
गॅविन न्यूसम लिखित सिटीझनविल या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी केला. या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्यजित तांबेंना फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसे जमाच करायची असतात.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.