आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत याठिकाणी आले आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. तर यापूर्वी खासदार संजय राऊतही बेळगाव दौऱ्यावर होते. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर भाजपविरोधात बेळगावात येऊन प्रचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच हे सर्व राऊतांनी काँग्रेसच्या सांगण्यावर केले असेही फडणवीस म्हणाले.
भाजपवर टीकेची झोड
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीतील भाजपसमोर काँग्रेस, जेडीएसचे तगडे आव्हान आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.
मराठी भाषकांच्या पाठीशी भाजप
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते संपूर्ण कर्नाटकात फिरत होते. मराठी भाषकांच्या पाठिमागे मी आणि भाजप आहे. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी येथे येत आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा काँग्रेस संजय राऊतांचा मित्रपक्ष आहे. त्यांनी याठिकाणी उमेदवार उभे करू नये याबाबत त्यांनी काँग्रेसला सांगायला हवे होते. मात्र काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत याठिकाणी आले.
हेही वाचा
राष्ट्रवादीत असंतोष:पवार कुटुंबात एक नाते, पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही; संजय राऊतांचे अजितदादांविषयी सूचक विधान
अजित पवारांविषयीच्या निर्माण केलेल्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नाते आहे. पण राजकारण वेगळे असते. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. आज राष्ट्रवादीत आम्ही असंतोष पाहतोय, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज हे वक्तव्य केले आहे. राऊतांनी अजित पवारांबाबत केलेल्या या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.