आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुहृदयसम्राट-जनाब वाद:देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ही बाळासाहेबांचीच पुण्याई, त्यांच्याच आशिर्वादाने पद मिळाले, एकनाथ खडसेंचे फडणवीसांना खडे बोल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनाब या बिरुदावलीवरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले. पण आता याच मुद्द्यावर महाविकास आघाडीतील नेते प्रत्युत्तर देत आहेत. जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चांगलेच खडसावले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारण वेगळीच चर्चा सुरु झाली होती. एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरीही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. खासकरून शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेत उघड नाराजीही व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारले, असे म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

“नरेंद्र मोदींनाही देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे. देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. त्या मंत्रीमंडळात मीसुद्धा होतो. आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन त्यांनी त्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. अलिकडे ते जी वक्तव्ये करत आहेत ती नैराश्यातून आलेली असावीत,” असे एकनाथ खडसे यांनी म्हणाले.

नेमके काय म्हणाले होते फडणवीस?

आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसेही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारले. अजानची स्पर्धा सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात,”असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

उद्धव ठाकरे यांनी केला होता पलटवार

शिवसेना भवनावर पार पडलेल्या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानामध्येही शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले होते. “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...