आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने सहाव्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर संभाजीराजेंची राज्यसभेची वाट कठीण झाली आहे. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजेंना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा विषय सर्वात प्रथम शरद पवारांनीच चर्चेला आणला होता. मात्र, नंतर हा विषय वेगळ्याच वळणावर गेला. आता राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न दिसत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर आपण फार बोलणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनीच उत्तर द्यावे
राज्यातील महागाईसाठी केंद्र सरकार नव्हे तर मविआ सरकारच जबाबदार आहे, याचा पुनरूच्चार आज देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात पेट्रोल-डिझेलवर केंद्राचा कर 19 तर राज्याचा कर 29 रुपये आहे. राज्य सरकार कर कमी करून सामान्यांना दिलासा का देत नाही, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
पुण्यात आंदोलन
महागाई व इंधन दरवाढीवरून आज भाजपतर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी वसुलीत अडकलेल्या मविआ सरकारने पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्याची फुसकी घोषणा केली. पण आघाडीच्या राजकीय साठमारीत त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. याचाच निषेध करण्यासाठी आज आंदोलन केल्याचे पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.