आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार टोला:आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचेय, ते जे बोलताहेत, ते प्रतिक्रीया देण्याइतपत प्रगल्भ नाही - देवेंद्र फडणवीस

अयोध्या2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर “आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचे आहे, त्यांची विधाने प्रतिक्रीया देण्याइतपत प्रगल्भ नाही.'' असा जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार हे अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले आहेत. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अयोध्येला जाणाऱ्या आमदारांवर जहाल भाषेत टीका केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले.

काय म्हणाले फडणवीस?

आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचे आहे. ते जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रिया देण्याइतके प्रगल्भ ते बोलत नाहीत. अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनानंतर फडणवीस यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी एकाच वाक्यात आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरून टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, सध्या कलियुग सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. ठीक आहे, पण आम्ही नक्कीच पुन्हा राम राज्य या महाराष्ट्रात आणू. हाच विचार घेऊन आम्ही चालत आहोत. ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई…’, हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

CM शिंदेंनी डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते कालच अयोध्येत दाखल झाले. त्यांच्यासोबत बंडखोर आमदार, भाजप नेते, कॅबिनेटमधील मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करतोय.