आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भांडुप कोव्हिड हॉस्पिटल आग प्रकरण:किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे? देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली

भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळावर जाऊन या घटनेची पाहणी केली. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना लवकरच मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिली. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करत घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

फडणवीस म्हणाले की, 'कोणतेही फायरसेफ्टी ऑडिट येथे झालेले नाही. सरकार घटना घडल्यानंतर घोषणा करते. मात्र या पलिकडे सरकार काहीच करत नाही. जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचा बीएमसीचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसत आहे. या संदर्भात आता काही जास्त बोलता येणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. मात्र मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे? असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसेच. मला वाटतेय की, या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी, केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने व्हावी अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या भांडुप परिसरामध्ये एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनवलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली. या दुर्घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल 70 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले आहे. फायर ब्रिगेडच्या 23 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचल्या. 13 तासांच्या प्रयत्नानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...