आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मागणी:पूर आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने रोख स्वरुपात मदत करावी, धोकादायक गावांचे तातडीने सर्वेक्षण करावे; देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा

गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. या तुफान पावसामुळे पुराच्या आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांचे संसार हे उघड्यावर आले आहेत. आता यांना राज्य सरकारने तातडीने रोख स्वरुपात मदत करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत!' असे फडणवीस म्हणाले आहेत.

अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा
पुढे ते म्हणाले की, कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे. कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा.' अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे
'धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे. कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे!' असेही फडणवीस म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...