आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सीबीआय तपास नाही तर किमान ईडीने तरी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाकडे लक्ष घालावे, देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र तरीही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणात विरोधीपक्ष नेतने देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं जनमत आहे. मात्र राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखल करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आली आहे. पुढे फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाॅंड्रिंग असल्याचे आढळून आले आहे. याच कारणामुळे ईडीने चौकशी करावी. असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.

यापूर्वी अनेकांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणी केली होती. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी लावू धरली आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिस सक्षम असल्याचे म्हटले होते.

Advertisement
0