आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचे सोनिया गांधींना खुले पत्र:माजी मुख्यमंत्री म्हणाले- महाविकास आघाडी सरकारने राज्याला देवाच्या भरवशावर सोडले, मृतांचे आकडे लपवणे हे महाराष्ट्राचे मॉडेल का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपण 13 मे 2021 चा कोरोना महामारीचा आकडा बघितला तर त्यातील 22% रुग्ण फक्त एकट्या महाराष्ट्रातील आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग कमी होत असला तरी यावर राजकारण मात्र तापलेले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना खुले पत्र लिहले आहे. पत्रात त्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला दिला आहे.

पत्रानुसार, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात अपयशी ठरले असून राज्याला देवाच्या भरवशावर सोडले असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. पुढे बोलताना म्हणाले की, ही जनता आहे यांना सर्व माहित आहे. या पत्रातील एक प्रमुख भाग काँग्रेसच्या पाठिंब्याने तयार झालेले महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात कसे अपयशी ठरले यावर होता.

फडणवीसांचे सोनिया यांना पत्र

  • आदरणीय, श्रीमती सोनिया गांधी... आशा आहे की, आपण निरोगी आणि कार्यक्षम असाल. आपल्याशी पत्रव्यवहार करण्याचे काही खास कारण आहे. तुम्ही पंतप्रधान मोदी यांना पाठवलेले काही पत्र आणि तुमच्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया मी वाचल्या. मला वाटते की, कदाचित काही मुद्दे तुमच्या लक्षात आणून दिले नसतील. त्यामुळे त्या गोष्टी तुमच्या समोर ठेवण्यासाठी हे पत्र लिहिले आहे.
  • गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोना महामारीशी लढत आहोत. अशा परिस्थितीत अनेक प्रश्न देशातील सध्याच्या परिस्थितीवर उपस्थित करण्यात आले. दरम्यान, तुम्हाला माहितच असेल की, आम्ही संपूर्ण देशातील कोरोना महामारीचा विचार करत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थितीकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही.
  • जर आपण 13 मे 2021 चा कोरोना महामारीचा आकडा बघितला तर त्यातील 22% रुग्ण फक्त एकट्या महाराष्ट्रातील आहे. (जे अनेक महिन्यांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक होते) देशातील एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रात हे प्रमाण 30 टक्के आहे.

महाराष्ट्र सरकार मृतांचा आकडा लपवत आहे
ते पत्रात पुढे म्हणाले की, राज्य सरकार आणि मीडिया मुंबईलाच महाराष्ट्र समजण्याची चूक करत आहे. मुंबईतील परिस्थिती बघितली तर येथे चाचण्या कमी करण्यात येत आहे. अशावेळी कमी चाचणीत देखील रॅपिड टेस्ट करत एक नवीन मॉडेल तयार केले जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार कोरोनामुळे होणारे मृत्यू 'डेथ ड्यू टू अदर रीजन' या श्रेणीमध्ये टाकून मृत्यूंचा आकडा लपवत आहे. एकट्या मुंबईत मृत्यूंचा आकडा 40 टक्के आहे.

कोरोनाशी लढण्यावर प्रश्न उपस्थित
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, राज्य सरकार मृत्यूंचा आकडा लपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कारण मुबंईतील वार्षिक मृत्यूंची सरासरी 88 हजारांच्या जवळपास राहते. परंतु, 2020 मध्ये कोरोनामुळे मरणार्‍यांचा आकडा 11 हजार 116 दाखवला असून यातील 9 हजार 603 मृत्यू लपवल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशात दररोज 4 हजार मृत्यूंची नोंद होत आहे. यातील 850 मृत्यू फक्त एकट्या महाराष्ट्रात होत असून याचे प्रमाण 22 टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...