आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मांडले 'पंचामृत':शेतकरी, महिला, गुंतवणूक, रोजगार, पर्यावरणपूरक विकास यांचा समावेश

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस यांचा हा पंचामृत अर्थसंकल्प. शाश्वत शेती, महिला आदिवासींसह सर्व समाजघटक. भरीव भांडवली गुंतवणुकीत पायाभूत विकास, रोजगार निर्मितीवर भर देण्याची केली घोषणा.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.

हे आहेत महत्त्वाचे घटक

  • शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
  • महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • पर्यावरणपूरक विकास
बातम्या आणखी आहेत...