आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:केंद्रीय यंत्रणाना हाताशी धरत देवेंद्र फडणवीस यांनी तपास केला असावा, प्रवीण चव्हाण प्रकरणावर शरद पवार यांचा आरोप

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्हामध्‍ये कथित पुरावे सादर केले. यात 125 तासांचं रेकॉर्डींग दिले आहे; अशी माहिती देखील दिली. आता पेन ड्राईव्हवर प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं सविस्तर मत मांडत भाजपला आणि फडणवीस यांना अनेक चिमटे काढले आहेत. यामध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह विधानसभा अध्याक्षांकडे सोपवण्यात आले आहेत. या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपचे राज्‍यात सरकार गेल्‍याने ते अस्वस्थ झाले आहेत. मला त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सध्‍या मी आरोपांच्या खोलात अद्याप गेलो नाहीये. मात्र, असे प्रकरण तयार करत सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे सांगतानाच शरद पवारांनी हे सरकार 5 वर्षे टिकणार असल्‍याचे देखील भाष्‍य केले आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज या फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातात आहेत. त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट असल्याचं यावेळी पवारांनी म्हटलंय. तसेच या 125 तासांच्या रेकॉर्डींग करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांनी फडणवीसांचं उपरोधात्‍मक कौतुकदेखील केले आहे. प्रकरणात माझे नाव घेतले गेले आहे; मात्र या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही असे देखील सांगायला पवार विसरले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...