आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डिझॅस्टर टुरिझम’ला प्रत्युत्तर:'मंत्री बनल्याने शहाणपण येतच असं नाही, नया है वह' म्हणत देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टीका केली होती. आता फडणवीस यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री बनल्याने शहाणपण येत नाही, नया है वहं, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. मात्र मंत्री बनले म्हणजे शहाणपण येतंच असं नाही ना? आदित्य ठाकरे नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.'

आदित्य ठाकरे म्हणाले होते की...

सध्या आमचा भर नागरिकांना फिट ठेवण्यावर अाहे. विरोधी पक्ष मात्र इथल्या ‘हेल्थ आणि डिझास्टर टुरिझजम’मध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. एमएमआर रिजनमधील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी शनिवारी घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली होती. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम करत आहे. तर, आम्ही मात्र, लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

फडणवीसांचा राज्यभर दौैरा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरे करून आरोग्य यंत्रणातील त्रुटीवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विराेधी पक्षात यामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

तुम्ही लाेकांची कामे करा

आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा. कोरोना हे जगातील सर्वात मोठी महामारी असून एका शहरापुरताच मर्यादित नाही आहे. विरोधी पक्षाने टीका करताना विचार करून करावी. इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. एमएमआर रिजनमध्ये धारावी पॅटर्न राबवणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser