आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटमधून महाराष्ट्राला काय?:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्र, साखर कारखानदारीला बुस्ट मिळणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्यातील सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारीला बुस्ट मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

कृषिपत संस्थांना मल्टीपर्पजचा दर्जा

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?, यावर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषिपत संस्थांना आता मल्टीपर्पज सोसायटीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थांना आता कोल्ड स्टोरेजपासून पेट्रोल पंप चालवण्यापर्यंतचे व्यवसाय करता येणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कृषिपत संस्थांना आता केंद्रातील 20 विविध योजनांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे गावपातळीवर सहकार मजबूत होणार आहे.

साखर कारखान्यांना 10 हजार कोटींची कर सवलत

बजेटमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीलाही बुस्टर मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांचा 2016 नंतरचा इन्कम टॅक्स रद्द केला होता. मात्र, 2016 पूर्वीच्या कराचे काय? हा प्रश्न शिल्लक राहिला होता. त्यावर आज बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2016 पूर्वी कारखान्यांनी एफआरपीसाठी केलेला खर्च हा कर सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास 10 हजार कोटींचा कर भरावा लागणार नाही. मोदी सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना दिलेला हा सर्वात मोठा बुस्ट आहे.

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवणार

अर्थसंकल्पाचे 'ग्रोथ आणि ग्रीन बजेट', असे वर्णन देवेंद्र फडणवीसांनी केले. फडणवीस म्हणाले, देशात रोजगार निर्मिती करणारा हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधेतील गुंतवणुकीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशात औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढला आहे. राज्यांना 50 वर्षांचे व्याजमुक्त कर्ज मिळणार आहे. त्यामुळे राज्यांच्या विकासालाही चालना मिळेल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पात शेतीवर विशेषत: नैसर्गिक शेतीवर मोठा भर देण्यात आला आहे. 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा ऱ्हास होतो. तो थांबवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सबसीडीच्या पलीकडे जाऊन हा विचार सरकार करत आहे.

अर्थसंकल्पाशी संबंधीत इतर बातम्या

1 तास 27 मिनिटांच्या भाषणात सीतारामन म्हणाल्या- गरिबांना आणखी वर्षभर मोफत धान्य, 50 नवे एअरपोर्ट-हेलिपॅड बनणार

इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल फोन स्वस्त; सिगारेट, चांदी, स्वयंपाकघरातील चिमणी महाग

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा:भरडधान्यांसाठी विशेष हब, 20 लाख कोटींच्या कृषी कर्जाचे उद्दीष्ट, कृषी स्टार्टअप्ससाठी कृषी वर्धक निधी

शिक्षण आणि आयटी क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा:देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करणार, 38 हजार शिक्षकांची भरती

बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी:गत 7 वर्षांत बाजारात सरासरी 0.9% पॉझिटिव्ह मूव्हमेंट, बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी

अमृतकाळचे सप्तर्षी:अर्थमंत्र्यांनी सांगितले बजेट 2023चे 7 प्राधान्यक्रम, या क्षेत्रांवर सरकारचा भर

उद्योगांसाठीच्या मोठ्या घोषणा:नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत, कोरोनाचा फटका बसलेल्या MSME ना दिलासा

बातम्या आणखी आहेत...