आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांना आली चिठ्ठी:स्वतःच दिले स्पष्टीकरण, म्हणाले- मी 2 पॅराग्राफ वाचायलाच विसरलो!

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प मांडत असताना एक चिठ्ठी आली. या चिठ्ठीत नेमके काय लिहिले होते, असा प्रश्न सगळ्यांनाच पडल्यावाचून राहिला नाही. यावेळी 'मी 2 पॅराग्राफ वाचायचे विसरलो,' असे म्हणत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले.

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

नेमके काय झाले?

राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस सांगत होते. नेमके त्याचवेळी त्यांना एक चिठ्ठी पाठवण्यात आली. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 2 पॅराग्राफ वाचायचे विसरलो आहे. त्यामुळे ही चिठ्ठी आली, असे त्यांनी सांगितले.

पंचामृत अर्थसंकल्प

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस यांचा हा पंचामृत अर्थसंकल्प होता. यामध्ये शाश्वत शेती, महिला आदिवासींसह सर्व समाजघटक, भरीव भांडवल, गुंतवणुकीत पायाभूत विकास, रोजगार निर्मितीवर भर देण्याची घोषणा करण्यात आली.

नमो शेतकरी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.

वातावरण हलके-फुलके झाले

देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत होते. त्यामुळे सभागृहात वातारवण काहीसे धीरगंभीर झाले होते. पण फडणवीसांनी भाषणात अचानक 'अमृता' असा नामोल्लेख करत कोटी केली. त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकून सभागृहातील वातावरण काहीसे हलके-फुलके झाले.

अर्थसंकल्पाशी संबंधित बातम्या

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी:वार्षिक 12 हजार रुपये मिळणार, केवळ एका रुपयात पीक विमा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख:जाणून घ्या- यंदाच्या अर्थसंकल्पातील आरोग्यासंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा

अंगणवाडी-आशा सेविकांच्या मानधनात वाढ:लेक लाडकी अभियानासह फडणविसांनी केल्या 'या' महत्वाच्या घोषणा

नव्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी:अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीसांची घोषणा, कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणार

देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मांडले 'पंच अमृत':शेतकरी, महिला, गुंतवणुक, रोजगार, पर्यावरणपूरक विकास यांचा समावेश

बातम्या आणखी आहेत...