आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचाळविरांचे फडणवीसांनी टोचले कान:म्हणाले - हुतात्मा स्मारकावरही काही जण राजकारणावरच बोलतात, पण मी राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या. तसेच वाचावळविरांचे कान टोचले. आज महाराष्ट्र दिवस आहे, काही लोक या ठिकाणी येऊन, राजकीय विधानं करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही. ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण येत असतो, त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, असे ते म्हणाले.

अनेकांना ही सवय असते की हुतात्मा स्मारकावर येऊन देखील राजकारणावर बोलतात. मात्र आम्ही ते करणाऱ्यातील नाही आहोत, हे हुतात्मा स्मारक आहे इथे केवळ हुतात्म्यांचं स्मरण होईल आणि महाराष्ट्र दिवसाबद्दल बोललं जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, भारताच्या सर्व जनतेला मी खूप शुभेच्छा देतो. आमचा महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर अग्रेसर राहो आणि हा महाराष्ट्र तयार करण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य दिलं. अशा सगळ्यांना अभिवादन करत असताना, महाराष्ट्रातील शेवटचा व्यक्ती, दीन, दलित,गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त खऱ्या अर्थाने या राज्याने न्याय द्यावा आणि त्यांच्या जीवनात प्रगती यावी, अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या या महाराष्ट्र दिनी मी देतो, अशा शब्दात देवेंद्र यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

याशिवाय, आज कामगार दिनाच्यादेखील फडणवीस यांनी टि्वट करून शुभेच्छा दिल्या. श्रम हेच सत्य आहे.. श्रम हेच शाश्वत आहे. श्रमालाच प्रतिष्ठा आहे. राष्ट्राच्या उभारणीत जे असंख्य हात लागतात, त्या सर्व कामगार बंधू-भगिनींना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा, असे टि्वट फडणवीस यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...