आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण याचिका:सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यानी काय माशा मारायच्या का? फडणवीसांचा राज्य सरकारला खोचक सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. आता यानंतर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. मात्र, त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे.

याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सर्व काही केंद्राने करायचे आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या अन् मिळालेले आरक्षणही घालवायचे असे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकते यासंदर्भात विचार केला पाहिजे.'

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. 102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारी असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 'आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचे अभिनंदन करेन की इतक्या जलद गतीने केंद्राने आपली भूमिका मांडली आहे. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये व्यस्त आहे. तुम्हाला माहिती नाही का की गव्हर्नरच्या हातात काही नाही. असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...