आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुकेश अंबानींच्या एंटीलियासमोर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद हत्येवरून विधानसभेत आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जूंपली. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्ज विधासभेत वाचून दाखवला. विमला हिरेन यांना एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा संशय आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अर्ज वाचताच सभागृहात गदारोळ उडाला.
माझी चौकशी करा - देवेंद्र फडणवीस
यावेळी फडणवीस म्हणाले की, मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा काही अडचण नाही. माझ्याकडे बरीच माहिती आहे. माहिती मिळवण्याचा माझा अधिकार आहे. माझी चौकशी करा, पण तुम्ही खुनी लोकांना का सोडताय?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
फडणवीस पुढे म्हणाले की, सचिन वझे हा एका पक्षाशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री त्याला पाठीशी घालत आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे म्हणून अपराध्याला पाठीशी घालणे योग्य नव्हे. उपलब्ध पुरावे वझेवर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करासचिन वझे यांना आत्ताच्या आत्ता निलंबित करा आणि अटक करा, अशी मागणी फडणवीसांनी केली.
राज्य सरकार योग्य तपास करेल- अनिल देशमुख
यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, मनसुख हिरेन आत्महत्येचा तपास एनआयए करत आहे. हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. ATS याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही, शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा ATS कडे द्या, असे अनिल देशमुख म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.