आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार:मराठी भाषेच्या प्रचारासाठी भाषा युवक मंडळ स्थापनार - फडणवीस

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकारने प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशी घोषणा केली आहे. या विद्यापीठाला चक्रधर स्वामींचे नाव देणार आहे. असून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणार असे जाहीर केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरचे महत्व जाणून घेत येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे बजेटमध्ये जाहीर केले आहे.

फडणवीस यापुढे बोलताना म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील वाई येथे विश्वकोष कार्यालयच्या इमारतीसाठी तर ऐरीली येथे मराठी भाषा भवनाच्या इमारतींची कामे करणार आहोत असे जाहीर केले आहे. तर मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी विधीमंडळात दिली आहे.

लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मराठीतील पहिला ग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमधून उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित वृत्त वाचा

अंगणवाडी-आशा सेविकांच्या मानधनात वाढ:लेक लाडकी अभियानासह फडणविसांनी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात देंवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. काल साजरा झालेल्या महिला दिनानंतर महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्यात आले. वाचा सविस्तर

हे ही वृत्त वाचा

शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ:देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिक्षण क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस, जाणून घ्या महत्वाचे निर्णय

शिक्षण क्षेत्रासाठी 1 लाख कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. अंगणवाडी ते उच्चशिक्षण 1 लाख 866 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...