आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. गरीबांचे मसिहा आहेत. पंतप्रधानपदी आरुढ झाल्यापासून त्यांनी गरीबांच्या कल्याणाचा अजेंडा राबवला आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे.
सर्वसामान्यांचा मोदींवर विश्वास
आज भाजपचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे देवदुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला भाजप पक्ष आणखी पुढे न्यायचा आहे. आज भाजपा देशातील सर्व भागात जनतेचा पक्ष म्हणून काम करताना पाहायला मिळत आहे. ईशान्य भारतात भाजपाची सरकार स्थापन झाली आहेत. समाजातील सर्व स्तरातील लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे.
भारतात एकालाही भुकेने मरू दिले नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी गेल्या 9 वर्षांपासून घर, संसार सोडून दिवसातील 24 तास भारताचा विचार करत आहेत. त्यामुळे जनतेत पंतप्रधान मोदींबद्दल विश्वास तयार झाला आहे. करोनासारख्या महामारीत जगात लोक भुकेने मरत होती. पण, भारतात एकही व्यक्तीला भुकेने मरू दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांपर्यंत अन्न पोहचवत होते.
सत्ता केवळ साधन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण काही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. सत्ता आपल्यासाठी केवळ एक साधन आहे. सत्तेचा उपयोग करुन आपल्याला सर्वसामान्यांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. सामाजिक, आर्थिक बदलासाठी आपल्याला सत्तेचा वापर करायचा आहे. केवळ तेवढ्यासाठीच आपल्याला सत्ता महत्त्वाची आहे.
भाजप हा सामान्यांचा पक्ष
फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर अवघे 4 ते 5 देश आहेत, ज्यांना करोनाची लस तयार करता आली. भारतातही कोरोनाची लस तयार झाली असून 135 कोटी भारतीयांना ती मोफत देत त्यांना जगवाण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केले. भाजप हा जनसामन्यांचा पक्ष आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आपण गरीबांसाठी दहा लाख घरांची घोषणा केली आहे. सरकार शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात विमा देत आहे. सामान्य माणसाला 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा देण्याचे सरकारने ठरवले आहे. समाजात चांगले बदल घडवण्याचे काम आपण करत आहोत.
हेही वाचा,
घणाघाती टीका:शिंदे, फडणवीस यांच्या टोळ्या अंडरवर्ल्डप्रमाणे राज्य करत आहेत; महाराष्ट्रात सरकारचे अस्तित्व नाही- संजय राऊत
महाराष्ट्रात सरकार नसून अंडरवर्ल्डप्रमाणे राज्य चालवले जात आहे. मुंबई, ठाण्यात ज्याप्रमाणे अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी आपापला परिसर वाटून घेतला होता, त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोळ्या राज्य चालवत आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.