आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खडसावले:वक्तव्य सहन न करण्यासारखे; ...मग उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर?

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत हे विधानमंडळाला चोर म्हणत आहे. पण उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय का असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य हे सहन करण्यासारखे नाही, अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारातून निर्णय घ्यावा, आज जर आपण विषय गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा असे हजारो राऊत विधीमंडळाच्या विरोधात बोलतील. राऊतांकडून विधीमंडळाचा अपमान झाल्याचेही फडणवीस म्हणाले. तर उद्धव ठाकरेंही याचा विधीमंडळाचे सदस्य आहेत, त्सांच्यासह आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतोय? आम्ही काय गुंड आहे का असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटले जाते. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

हे ही वृत्त वाचा

संजय राऊत यांना तातडीने अटक करावी:भरत गोगावले; म्हणाले- राऊतांनी राजीनामा देत हिंमत असेल तर सुरक्षा नाकारुन फिरून दाखवावे

खासदार संजय राऊत यांना तातडीने अटक करावी. त्यांनी हिंमत असेल तर सुरक्षा नाकारुन फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दिले आहे. आमची मते घेऊन संजय राऊत खासदार झाले आहेत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असेही गोगावले यांनी म्हटले आहे.

दरम्यान विधीमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदारांकडून संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...