आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांची माहिती:संजय राऊत यांना दारुच्या नशेत जीवे मारण्याची धमकी दिली, एका संशयिताची ओळख पटली- देवेंद्र फडणवीस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे. संशयिताने दारूच्या नशेत धमकी दिली, अशी प्राथमिक माहिती असल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

पोलिस, सरकार शांत बसणार नाही

संजय राऊत धमकी प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुण्यातील एकाने दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, विरोधकांना आलेल्या धमक्या राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कोणी कोणाला धमकी दिली तरी पोलिस, राज्य सरकार शांत बसणार नाही.

मी गृहमंत्री असल्याने काहींची अडचण

दुसरीकडे, संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नुकत्याच राज्यात काही ठिकाणी झालेल्या दंगली व आता संजय राऊत यांना आलेली जीवे मारण्याची धमकी हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्र्यांना कारभार झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला कल्पना आहे की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. मी गृहमंत्री नसलो तर बरे होईल, असे काही जणांना मनातून वाटतेय.

शिंदेंनी मला गृहमंत्रीपदाचा चार्ज दिला

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणी काहीही बोलले तरी मी गृहमंत्री पदावर कायम राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला गृहमंत्रीपदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळे राज्यात जे कुणी चुकीचे काम करत आहेत, त्यांना शासन झाल्याशिवाय सरकार शांत राहणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना सोडणार नाही.

राज्यात कायद्याचेच राज्य राहील

राज्यात केवळ गद्दारांना सुरक्षा दिली जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलिस यंत्रणा असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कायद्याचेच राज्य राहील. मीदेखील कायद्याने राहतो व कायद्याने वागतो. मी कोणाला घाबरत नाही व दबतही नाही. राज्यात जेजे चुकीचे काम करतील, अशा सर्वांवर कारवाई होईल.

संबंधित वृत्त

सुरक्षेत वाढ:संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मोबाइलवर मेसेज; सरकारला गांभीर्य नाही- राऊत

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर