आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाकरे सरकारवर निशाणा:आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन निकालांवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आज अर्णब गोस्वामी प्रकरण आणि कंगना रनोट प्रकरणाचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने एकाच दिवशी या दोन्ही प्रकरणावर निर्णय दिला. या नंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधणे सुरू केले आहे. आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

अभिनेत्री कंगना रनोटवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणे ही चूक असल्याचे निरीक्षणं नोंदवले आहेत. या दोन निकालांवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अर्णबच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालय:महाराष्ट्र पोलिसांच्या FIR मधून आरोप सिद्ध होत नाही, कुणाचे एका दिवसाचेही स्वातंत्र्य हिरावणे चुकीचेच

याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांची छळवणूक करण्यासाठी नाहीत, हे जर न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो,' असा खोचक सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

हायकोर्टाचा निर्वाळा:कंगनाच्या बंगल्याची बीएमसीकडून झालेली तोडफोड हायकोर्टाने ठरवली बेकायदा! सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर संयम ठेवण्याची कंगनालाही ताकीद

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser