आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणून दौरे गरजेचे:आमच्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते, म्हणूनच दौरे काढणे गरजेचे! शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दौऱ्यांमुळे आम्हाला लोकांचा आक्रोश समजतो - फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संकटग्रस्त भागात राजकीय दौरे टाळण्याच्या आवाहनावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी शरद पवार यांच्या या मताशी सहमत आहे. पण, त्यांच्या वक्तव्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

दौरे काढल्यामुळे शासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. परंतु, मी विरोधी पक्षनेता असल्याने तेथे शासकीय यंत्रणा फारशी नसतेच. परंतु, आमच्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते आणि त्यामुळे दौरे काढणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

दौऱ्यांमुळे आम्हाला लोकांचा आक्रोश समजतो - फडणवीस
ते पुढे म्हणाले की, जे लोक संकटग्रस्त आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला यामाध्यमातून समजून घेता येतो आणि हे प्रश्न आपल्याला सरकार पुढे मांडता येते. यासाठी हे दौरे गरजेचे असून आपल्यामुळे मदत व बचावकार्यात अडथळा येऊ नये असे शरद पवारांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?
संकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कामात अडथळे येतात असे पवारांनी आपल्या अनुभवातून सांगितले. पवार म्हणाले, माझा पूर्वीचा अनुभव आहे. प्रामुख्याने लातूरच्या वेळी... अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते.

माझे आवाहन आहे, की असे दौरे टाळा. मी लातूरला असताना आम्ही सगळे कामात होतो. तेवढ्यात पंतप्रधान येत होते. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते, की 10 दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल. त्यामुळे त्यांना 10 दिवसांनंतर येण्याची विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...