आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लोक माझे सांगाती':पवार साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही,  योग्य वेळी पहाटेच्या शपथविधीवर मी पुस्तक लिहिणार; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पवार साहेबांचे आत्ता आलेले लोक माझे सांगाती पुस्तकाची दुसरी आवृत्ती मी अजून वाचलेली नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही. मात्र योग्य वेळ आल्यावर पहाटेच्या शपथविधीवर मी पुस्तक लिहिणार आहे. तेव्हा नेमके काय झाले होते याबाबत सगळ्यांना कळेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा झाला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या पुस्तकावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार साहेबांचे लोक माझे सांगाती पुस्तकाची दुसरी आवृत्ती मी अजून वाचलेली नाही. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. मात्र योग्य वेळ आल्यावर पहाटेच्या शपथविधीवर मी पुस्तक लिहिणार आहे. तेव्हा नेमके काय झाले होते याबाबत सगळ्यांना कळेलच. असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे.

शरद पवारांनी काय लिहिलेय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

भाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, पण कार्यकर्त्यांचा विरोध कायम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. वाचा सविस्तर