आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पलटवार:वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही, तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • त्यांच्यातील अंतर्विरोधामुळे समाज मनात हे सरकार एकरुप नसल्याचे चित्र - विरोधी पक्षनेते
  • भूमिका नसलेला, लांगुलचालन करणारा 'सामना'; कधी पवारांच्या बाजूने, कधी राज्यपालांच्या : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सध्या दररोज राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेनेसे आजही 'अंतर्विरोधाच्या चिपळ्या' या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस आणि भाजपर टीका केली. यावर ‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 

आम्हाला सरकार पाडायची घाई नाही 

फडणवीस पुढे म्हणालेकी, "त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचे काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्ष सरकार चालवावे.

हा दौऱ्या कुणाच्या विरोधातला नाही तर सरकारला मदत करणारा 

देवेंद्र फडणवीस सध्या कोरोना काळात राज्य दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील विविध जिल्हा रुग्णालये, कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी भेट देऊन तेथील आढावा घेत आहेत. या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ''हा कुणाच्याही विरोधातला दौरा नाही. सरकारला मदत करणारा दौरा आहे. यंत्रणांमध्ये समनव्य नाही. आमचा सर्व फोकस कोरोनावर आहे. पण चोराच्या मनात चांदणं असतं, तशी या सरकारची अवस्था आहे. त्यामुळे हे सरकार पडणार नाही असे या सरकारला रोज का सांगावे लागते, त्यांच्यातील अंतर्विरोधामुळे समाज मनात हे सरकार एकरुप नसल्याचे चित्र आहे

सरकारने समन्वयाने प्रशासन चालवावे

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यासंदर्भात अशी नामुष्कीची अवस्था आधी कधीच आली नव्हती. आधी मुख्यमंत्र्यांना डावलण्यात आलं आणि आता मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असा टोला त्यांनी लगावला. समन्वयाने प्रशासन चालवायला हवे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला यावेळी दिला.

सामना आता शिल्लक नाही, तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे

यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करतही सामनामधून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देव पळून गेले, हे सामना प्रकाशित करतं. मुख्यमंत्री विठ्ठलाला साकडे घालतात. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...