आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका:हिंदू सणांवरचे संकट टळले हे खरे; लोकांना त्याचा आनंद आहे!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सरकार आले व हिंदू सणांवरचे संकट टळले हे खरे आहे आणि लोकांना त्याचा आनंद आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसेनेवर टीका केली. बेस्ट बसेसवर लागलेल्या बॅनरवरुन त्यांना सवाल करण्यात आला होता. यावर ते बोलत होते. शिवाय, भाजप पक्षाच्यावतीने बॅनर लागले आहेत. पण, यावर भाजप नेते आशिष शेलार योग्य उत्तर देतील, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मुंबई आमचा फोकस आहे. आम्हाला मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची आहे. शिंदे सेना आणि भाजप मिळून निश्चित आम्ही विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अमित शाह हे मुंबईत गणेशाच्या दर्शनासाठी येत आहेत. पण, थोड्याप्रमाणात राजकीय चर्चा होतील, असे त्यांनी सांगितले.

आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, अशी जाहिरातबाजी मुंबईतल्या बेस्ट बसवर भाजपने केली आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असे जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, अशी जाहिरातबाजी मुंबईतल्या बेस्ट बसवर भाजपने केली आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असे जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

नेमके प्रकरण काय?

मुंबईतील बेस्ट बसेसवर भाजपने जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. यावर 'हिंदू सणांवरील विघ्न टळले, गणपती बाप्पा मोरया' अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. बेस्ट बसेससह बसस्टॉपवरही या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...