आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांचे ट्विट:बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी अभिवादन करत फडणवीसांनी शिवसेनेला लगावला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) आठवा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने आज सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान त्यांनी आठवणींना उजाळात देत असताना शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. फडणवीसांनी या व्हिडीओतून सेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणही करुन देण्यात आली आहे. तसेच बाळासोबत ठाकरेंच्या भाषणासोबत देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा अंशही यात आहे. तसेच ते यामध्ये बाळासाहेबांविषयी बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी 'विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असे म्हणत व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये फडणवीस बोलत आहेत की, 'बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्त्रोत होते. बाळासाहेबांचे भाषण हे नेहमी सल्ला होते. आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचे, लोकांना पटणार असे बोलायचे. त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलत असत. त्यांना कोणी बोलावू शकत नव्हते' असे फडणवीस म्हणाले आहेत.

यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषाणाची क्लिप यामध्ये शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, 'दुसऱ्यांच्या विचाराने स्वत: चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की सर्व संपले. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असायला हवा. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले पाहिजे' हे विधान या व्हिडिओमधून शेअर करत फडणीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...