आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनपूर्वी पॅकेज द्या:फडणवीस म्हणाले- महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी इतर देशांप्रमाणे पॅकेज जाहीर करा; तुमचे वजन वापरून मिळतेय का बघा, आव्हाडांचे उत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपले केंद्र सरकार अजून राज्यांच्या हक्काचे पैसे सुद्धा देत नाही आणि तुम्ही... -आव्हाड

महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करायचा असेल तर इतर देशांप्रमाणे आर्थिक पॅकेज पण जाहीर करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ज्या देशांची फडणवीसांनी उदाहरणे दिली तेथे राज्य सरकारांनी नव्हे तर केंद्र सरकारांनी पॅकेज दिले. आपले केंद्र सरकार तर राज्य सरकारच्या हक्काचे पैसे सुद्धा देत नाही. त्यामुळे, फडणवीसांनी आपले वजन वापरून काही मिळते का हे पाहावे असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली होती इतर देशांची उदाहरणे

उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये इतर देशांमध्ये कशा पद्धतीने लॉकडाउन जाहीर केले जात आहे याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिला. त्यावरूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. इतर देशांमध्ये लॉकडाउनची जशी मुख्यमंत्र्यांनी उदाहरणे दिली. तुलना करायचीच असेल तर त्या ठिकाणी नागरिकांना पॅकेज जाहीर करण्यात आले आहेत. अशी आठवण फडणवीसांनी करून दिली.

आपले केंद्र सरकार अजून राज्यांच्या हक्काचे पैसे सुद्धा देत नाही आणि तुम्ही...

त्यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. पॅकेज देणाऱ्या देशांत ते केंद्र सरकारांनीच दिले. आपल्या देशात केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसे सुद्धा देत नाही. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

फडणवीसांचा पलटवार, महाराष्ट्र सरकारने कुठलीही मदत केली नाही
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे कारण महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे ज्याने कोरोना काळात लॉकडाउन केल्यानंतर ही नागरिकांना कोणतीही मदत केली नाही. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचा पॅकेज दिला होता, मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले, कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे.

टीका करणे सोपे आहे -आव्हाड

जितेंद्र आव्हाड एवढ्यातच थांबले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगिरीचे तोंडभर कौतुक केले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे."

बातम्या आणखी आहेत...