आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:लॉकडाऊन काळातील अडचणींबाबत देवेंद्र फडणवीसांची उद्योगपतींशी चर्चा

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पुढील काळातील अपेक्षित असलेल्या उपाययोजना याबाबतही विचारविनिमय

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अडचणी, नंतरच्या काळात अपेक्षित उपाययोजना याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विविध उद्योजकांशी संवादसेतूच्या माध्यमातून चर्चा करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. 

या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयनका (ऑटोमोबाइल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रुईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शहा (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयनका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्यूचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते.

प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणी, या अडचणींवर सर्वांचे हित राखत सर्वांनी मिळून केलेली मात, आगामी काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना इत्यादींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा झाली. उद्योजकांनी आपल्या संकल्पना, सूचना, शिफारशी इत्यादी या वेळी मनमोकळेपणाने मांडल्या. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संवादसत्र अतिशय अभ्यासपूर्ण झाले आणि यातून आपल्यालाही अनेक नवीन बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या संकटकाळात तर आपण एकत्र येऊन अनेक समस्यांवर मात करतोच आहोत. अशीच मात आपण सारे मिळून येणाऱ्या काळातसुद्धा करू. प्रत्येक क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी सारे मिळून सामूहिक प्रयत्न करू. अशा प्रकारचे आणखी संवाद येणाऱ्या काळात करण्याचा मनोदयसुद्धा त्यांनी या वेळी बोलून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...