आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांवर बरसले फडणवीस:केंद्राप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही आर्थिक पॅकेज घोषित करावे, मोदींना पत्र लिहिणाऱ्या शरद पवारांवर फडणवीसांनी साधला निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • राज्यातील भाजप आमदारांनी पीएम केअर्समध्ये का दिले दान? फडणवीसांना काँग्रेसचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजवर पीएम नरेंद्र मोदींवर पत्र पाठवण्यावरून राज्याचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शरद पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारने सुद्धा अशाच प्रकारचे आर्थिक पॅकेज जारी करावे. आणि पवारांनी अशाच स्वरुपाचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पाठवावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाले फडणवीस...

फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्राप्रमाणे एक आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. शरद पवार यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. अशाच स्वरुपाचे पत्र पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लिहावे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर भाजप नेत्यांसह मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. 

भाजप आमदारांनी पीएम केअर्समध्ये काम दान केले? काँग्रेसचा टोला

याच मुद्द्यावरून काँग्रेसने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटा घेण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात मुख्यमंत्री रिलीफ फंड असताना सुद्धा चक्क पीएम केअर्स फंडमध्ये दान कशासाठी केला. असा सवाल काँग्रेसने केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपच्या सर्वच आमदारांनी कोव्हिड-19 दरम्यान आपल्या स्थानिक विकास निधीतून मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान न करता थेट पीएम केअर्सला दान केले. सोबतच, याची घोषणा करत असताना ट्विटरवर सेल्फी सुद्धा पोस्ट केले होते. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. मुळातच भाजप महाराष्ट्रविरोधी असून प्रत्येक बाबतीत राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोरोना विरोधात लढताना बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. तरीही केंद्र सरकारप्रमाणे राज्याने तसे आर्थिक पॅकेज जारी करू नये. कारण, केंद्राचे आर्थिक पॅकेज केवळ पोकळ आश्वासनांनी भरलेले आहे असे सावंत म्हणाले आहेत.

पवारांचे पंतप्रधानांना पत्र

शरद पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये आर्थिक पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय मिळाले असा जाब विचारला होता. लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या हातात सध्या कॅश नाही. अशात आर्थिक पॅकेजमधून या शेतकऱ्यांना काय दिले जाणार असे पवारांनी विचारले. सोबतच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅकेजचा तपशील दिला तो केवळ पुरवठा साखळीशी संबंधित होता. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्यासाठी आणखी वेळ लागेल. 

बातम्या आणखी आहेत...