आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खोचक टोला:एक शरद बाकी गारद नव्हे, तर एक नारद बाकी गारद, उद्धव ठाकरेही गारद का?  पवारांच्या मुलाखत टीझरवरुन फडणवीसांचा टोला 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सामना आता राहिलेला नाही - देवेंद्र फडणवीस

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच सामनामधून प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी संजय राऊतांनी आपल्या ट्विटरवरुन मुलाखतीचे टीझर शेअर केले आहेत. यावेळी ‘एक शरद! सगळे गारद!!’ अशा मथळ्याखाली ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का? असा टोला लगावला आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे. 

फडणवीस पुढे म्हणाले की, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सामना आता राहिलेला नाही. त्या काळात तत्त्वांच्या विरोधात सामना काम करत होता. आता ते ज्यांचे तत्त्व आहेत. अशा काँग्रेस राष्ट्रवादीचे मुखपत्र सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळात तत्त्वांच्या विरोधातल्या गोष्टी सामनाने कधीच केल्या नाहीत.' अशी टीकाही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.

पुढे फडणवीस म्हणाले की, राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का? असा मिश्किल सवाल त्यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या वाक्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला

0