आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपतींच्या नावाने राज्यपालांविरोधात 17 डिसेंबरला विरोधक मोर्चा काढत आहेत. परंतु त्यांची नाराजी राज्यपालांवर वेगळी आहे. त्यांचे मुळ दुखणे काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. मविआ आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जुन्या शत्रूत्वाला ताजे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मविआ'वर आज केली. ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल एकमेव
फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी शिवाजी महाराज आदर्श आहेत. राज्यपाल कोश्यारी असे राज्यपाल आहेत की ते रायगड, सिंहगड, प्रतापगढ आणि जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी मातृतीर्थावरही गेले आहेत. राज्यपालांसोबतच्या जुन्या रंजिशला ताजे करण्याचा हा प्रयत्न आहे.
अमित शहांची चर्चा केली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. सीमावादावर सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर या सर्व गोष्टींची सुरुवात झाली. विविध पक्षांच्या लोकांना आणि सीमावासीयांना चर्चेसाठी बोलावले होते. 48 तासांत शरद पवारांना बेळगावमध्ये जाण्याची वेळ येणार नाही असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
बोम्मईंच्या आश्वासनावर लक्ष
वाहनांवरील हल्ल्याप्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संपर्क साधला. मी त्यांच्याकडे नाराजी, चिंता आणि अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचेही फडणवीस म्हणाले. जे लोक असे कृत्य करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सरकार कुणालाही पाठींबा देणार नाही. त्यांनी जे आश्वासन आम्हाला दिले.
सीमावादावर परिस्थिती बिघडवू नका
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटकला माझे सांगणे आहे की, सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी चालू असताना सीमावादाची परिस्थिती बिघडवणे दोन्ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. सीमाभागातील लोकांची सार्थ अपेक्षा असते की, आपल्या लोकांनी आपल्याला पाठींबा द्यावा.
क्रियेला प्रतिक्रीया नको
फडणवीस म्हणाले, केंद्र, राज्य आणि कर्नाटक सरकार हे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील जनतेलाही माझी विनंती की, क्रियेला प्रतिक्रीया दिली तर या गोष्टी वाढत जातील त्या कुणाच्या हिताच्या नाही.
प्रत्येकाला संचार स्वातंत्र्य
आपले संविधानाने राज्यात ये- जा करण्याचे संचार स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड योग्य नाही. सुप्रीम कोर्टात खटला सुरू असताना हिंसा होणे योग्य नाही. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेला अबाधित राखणारे राज्य आहे येथे गुंडागर्दी होत नाही.
कुणाच्या चुकीच्या वक्तव्याचा किंवा कुणाच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असेल तरीही छत्रपती शिवरायांच्या
यांचे मुळ दुखणे वेगळेच
फडणवीस म्हणाले, छत्रपतींच्या नावाने मोर्चा काढला जात आहे. परंतु त्यांची नाराजी राज्यपालांवर वेगळी आहे. त्यांचे मुळ दुखणे काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. मविआ आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्यासाठी शिवाजी महाराज आदर्श आहेत. राज्यपाल कोश्यारी असे राज्यपाल आहेत की ते रायगड, सिंहगड, प्रतापगढ आणि जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी मातृतीर्थावरही गेले आहेत. राज्यपालांसोबतच्या जुन्या शत्रूत्वाला ताजे करण्याचा हा प्रयत्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.