आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामविआतील नाराज आमदारांकडून भाजपला मतदान करण्यात आले. असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्यसभेला आम्हाला 123 मतदान मिळाले आणि विधान परिषदेला आम्हाला 134 मतदान पडले. आता बहूमत दूर नाही असे म्हणत शिवसेनेला आणि मविआला इशारा दिलाा आहे. पक्षातील मानहानीला कंटाळून मविआ आमदारांकडून आम्हाला मतदान केले असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
फडणवीसांच्या नेतृत्वाचा विजय असून त्यांच्या नेतृत्वात भाजपचा हा विजय असल्याचेही ते म्हणाले, विधान परिषदेच्या मोठ्या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजयासाठी मविआतील अस्वस्थ आमदारांची मदत झाल्याचे विधान करत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी राज्यसभेसाठी 2 जागा लढवा असा प्रस्तावही मविआकडून आला होता असे पाटील यांनी यावेळी सांगितले. मविआतील मानहानीला कंटाळून आमदारांचे भाजपला मतदान केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मविआतील नेत्यांना आपल्याच पक्षातील आमदारांवर विश्वास नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. परिषदेत मागात घेतो असे सांगूनही माघार घेतली नाही असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.सरकार असूनही सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचा त्यांच्याच पक्षावर विश्वास नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. यामुळे आता सु
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.