आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छापेमारीवर प्रतिक्रिया:प्रताप सरनाईकांवरील ईडीच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले -''या' कारणामुळे ईडीने सरनाईकांच्या घरावर धाड टाकली'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आता या कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत छाड टाकली आहे.

फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, 'ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही' प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे.

टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार प्रताप सरनाईकांसंबंधित 10 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser