आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:भाईंच्या एका इशाऱ्याने धनंजय मुंडे झाले थंड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सूचक इशारा दिला होता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरजोरात घोषणा देणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभर प्रसिद्धीच्या झोतात होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सूचक इशारा दिला होता. त्याच्या परिणामी मंगळवारी (२३ ऑगस्ट) विरोधकांच्या आंदोलनात धनंजय मुंडे दिसलेच नाहीत. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ‘मुंडे हे खरे शिवसैनिक आहेत, कारण ते बेंबीच्या देठापासून ओरडतात. फडणवीसांनी तुमच्यावर दया, ‘करुणा’ दाखवली, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

आंदोलन अचानक ठरले होते, त्यामुळे मी नव्हतो : मुंडे
काल रात्री झोपण्यास विलंब झाला. त्यात अंबाजोगाईच्या लक्षवेधीची तयारी करण्यात सकाळी वेळ गेला. त्यामुळे उशिराने आलो. आज आंदोलन होणार होते हे निश्चित नव्हते. ते अचानक ठरले. सगळ्या आंदोलनांत मी सहभागी व्हायलाच पाहिजे, असे काही नसते, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...