आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला एअरलिफ्टद्वारे मुंबईत हलवले आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिव्य मराठीने धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात रात्री उशीरा घडला. यात त्यांच्या छातीला मार लागला असून छातीमध्ये 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे जोशी म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे ट्विट काय?
मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
धनंजय मुंडे यांच्या गाडीला साडेबारा वाजेच्या वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती.
कुठे घडली घटना?
अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे 12.30 वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.