आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडे यांचा सत्ताधारी पक्षाला इशारा:ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. शिंदे भाजप सरकार खोक्यामुळे आले. पण, हे सरकार आणखी ही ओके नाही. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले. तेव्हा नव्याने आलेल्या ईडी सरकार काही मदत करेल अशी अपेक्षा होती. सरकारने घोषणा केली पण मिळाले काहीच नाही. शेतकऱ्यांची दिवाळी सुखाने गेली नाही, असे धनंजय मुडे यांनी म्हटले. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस असते तर प्रकल्प गेला असता का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून गेला. हा विषय पुढच्या काळात येणार आहे. आता परिस्थिती अशी आहे. आता फक्त 40 आमदार राज्याचे सरकार चालवत आहेत. काल अचानक मुख्यमंत्र्याच्या सर्व बैठका रद्द झाल्या आणि ते ठाण्याकडे गेले. आता पुन्हा मुख्यमंत्री ठाण्यामार्गे सुरतेकडे जातात की काय? ही माहिती घेत होतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोला लगावला.

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांच्या शायरीतून धनंजय मुंडे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजवर निशाणा साधला.
‘अगर खिलाफ हैं होने दो जान थोड़ी है,

ये सब धुआं है कोई आसमान थोड़ी है,

लगेगी आग तो आएंगे घर कई जद में,

यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है,

जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे,

किराएदार हैं जाती मकान थोड़ी है,

सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में,

किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है’

विधानसभेचा वर्ल्ड कप आपल्यासमोर

अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडे यांनी एक प्रसंग सांगितला. दिल्लीत एका भाजप नेत्याने मला विचारले होते की, ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममतांसोबत आणि तामिळनाडूमध्ये स्टलीन यांच्यासोबत त्याचे राज्य उभे राहते. शरद पवार हे एक खुप मोठे नेते आहेत. तर मग त्यांच्यापाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र का उभा राहत नाही. तर आता याची देही याची डोळी आपल्याला हे सत्य करून दाखवायचे असेल तर 2024 चा विधानसभेचा वर्ल्ड कप आपल्यासमोर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असे दावे विरोधकांकडून करण्यात येत आहेत. त्यावर शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम, आंधी से कोई कहदे, की औकात में रहे ! या शायरीतून धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...