आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बलात्काराचा आरोप लावल्यानंतर अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनुसार, पक्षाने सध्या त्यांना पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने या प्रकरणाचा तपास केल्याशिवाय राजीनामा न मागण्याचा निर्णय घेतला. मात्र एक दिवसपूर्वीच पक्ष प्रमुख शरद पवार यांनी या मुद्द्यावरुन कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
प्रफुल्ल पटेल यांनी घरी बोलावली इमरजेंसी मीटिंग
माहितीनुसार, या मुद्द्याविषयी एनसीपी कोर कमेटीच्या नेत्यांची माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरा बैठक झाली होती. यामध्ये पटेल यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जल संसाधन मंत्री जयंत पाटीलही सहभागी होती. या मीटिंगमध्ये मुंडे यांना सध्या पदावरुन न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण आरोप लावणाऱ्या महिलेवर अनेक आरोप लावण्यात आलेले आहेत.
आरोप करणाऱ्या महिलेवर सातत्याने होत आहेत आरोप
मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप आणि मनसेच्या नेत्याने आरोप लावले आहेत. गुरुवारी भाजपचे नेता कृष्णा हेगडे यांनी महिलेवर हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा आरोप केला. हेगडे यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की, महिलेने त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनीष धुरी यांनीही अंबोली पोलिस स्टेशनमध्ये महिलेविरोधात तक्रार दिली आहे.
महिलेने म्हटले - तुम्हाला वाटत असेल तर मी मागे हटते
या दोन्ही नेत्यांच्या आरोपानंतर महिलेने सोशल मीडियावर एकानंतर एक अनेक पोस्ट लिहिल्या आणि आपला बचाव केला आहे. सोशल मीडियावर महिलेने लिहिले...
Our ab mujhe hatane our girane k liye itne logo ko aana pad raha hai, #maiakelivsmaharastra, ab aap sab jo likhna hai likho Baith k, god bless u
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यावरही महिलेने लावला आरोप
तपासात समोर आले आहे की, महिलेने 2019 मध्ये जेट एयरवेजचे एक अधिकारी रिजवान कुरैशी यांच्या विरोधातही तक्रार केली होती. या प्रकरणाची अनिश्चितता पाहता सध्या एनसीपी धनंजय मुंडेंवर घाईघाईत कारवाई करणार नाही.
मंत्री धनंजय मुंडेंवर महिलेचा हा आरोप
37 वर्षांच्या एका महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप लावला आहे. तिने सांगितले की, तिने 10 जानेवारीला मुंबई पोलिस कमिश्ननरला पक्ष लिहून सांगितले होते की, मुंडेंनी 2006 मध्ये अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. मात्र मुंडेंनी बलात्काराच्या आरोपाला आधारहिन असल्याचे सांगितले आहे. पण त्यांनी खुलासा केला आहे की, तक्रार करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत ते रिलेशनमध्ये होते आणि त्यांना त्या महिलेपासून दोन मुलं देखील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.