आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंना दिलासा:त्या महिलेचा यू-टर्न; कौटुंबिक कारणास्तव बलात्काराची तक्रार मागे घेत असल्याचे पोलिसांना दिले लेखी निवेदन

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे वादात वादात अडकलेले होते.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता कमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. धनंजय मुंडेंसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले आहे. असे तिने पोलिसांना लेखी लिहून दिली असल्याची माहिती आहे.

बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे वादात अडकलेले होते. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी म्हटले असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या विषयीच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यातील राजकारण एकच खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...