आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लैंगिक शोषणाचा आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुंडे यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असेही पाटील यांनी मह्टले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही मागणी केली आहे. ''सामाजिक न्यायमंत्री असलेल्या मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबदद्ल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्हीही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशाप्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.'' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून आपण मुंडेंचे नातेवाईक असल्याचा दावाही या तरुणीने केला आहे.
तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, 2006 पासून माझ्यावर अत्याचार सुरू होते. पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. तसेच याचे व्हिडिओ काढून धमकावले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.