आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडे यांची जयंती:'अप्पा... जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात', धनंजय मुंडेंनी आठवणींना दिला उजाळा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवार साहेब...एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त विविध राजकीय पक्षाचे नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काका गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे.

'आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन', असे धनंजय मुंडे सोशल मीडियावर म्हणाले आहेत.

यासोबतच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि 80 वर्षांचा तरुण म्हणजेच शरद पवारांचा वाढदिवस आहे. या निमित्तही धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 'पवार साहेब.. एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे' असे म्हणत मुंडेंनी पवारांना शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिले की,
'पवार साहेब...एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे! राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे! आदरणीय पवार साहेबांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser