आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात होणार एंट्री:धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा राजकारणात टाकणार पाऊल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची घेतली भेट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करुणा शर्मांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडेही एक तक्रार केली.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नाते मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पदार्पण करणार आहेत. रेणू शर्मांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. करुणा शर्मांनी बुधवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची भेट घेतली. मला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा शर्मा यांनी बुधवारी महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.

याविषयी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, 'मला सर्वात पहिले योग्य प्रकारे समाजसेवा करायची आहे. 25 वर्षे मी घरामध्ये होते. आता 2 ते 3 महिन्यांपासून घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. मात्र करावे लागले तर मी नक्की राजकारण करेल. लोकांच्या मनापर्यंत मला पोहोचायचे आहे. असे करुणा शर्मा म्हणाल्या. यासोबतच स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन महापालिकेत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

...यावर कारवाई झाली पाहिजे
करुणा शर्मांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडेही एक तक्रार केली. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येतात. या विरोधात कारवाई करायला हवी असे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे. यासोबतच त्या म्हणाल्या की, 'आम्ही आता निवेदन दिलेले आहे. सध्या इंटरनेटवर खूप वाईट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही साईट्स अश्लीलता पसरवतात. फेसबुकवर सुद्धा काही व्हिडीओ पॉप अप होतात. ते बंद व्हावे अशी मागणी करुणा शर्मांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...