आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आशियातील सर्वात मोठी आणि दाट वस्ती म्हणजे मुंबईची धारावी. हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र, आता जगासाठी आदर्श ठरत आहे. एप्रिलपर्यंत धारावीत कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू वेगाने वाढत होते. मात्र वेळीच केलेल्या उपाययाेजनांमुळे तेथे महामारी नियंत्रणात आणण्यात यश आले. संसर्ग रोखण्याची जलद आणि व्यवस्थित तयारी हे यामागचे कारण राहिले. एप्रिलपासून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ४७५०० लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या तापाची आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी केली. झोपडपट्टी आणि परिसरातील जवळपास ७ लाख लोकांची स्क्रीनिंग केली. तापावर उपचारासाठी विशेष दवाखाने बनवले. यामुळे रोज येणाऱ्या रुग्णांंची संख्या तीनपट कमी झाली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत आणि आता तर मृत्यूंचा आकडाही घटू लागला आहे. देशभरात मेपासून आतापर्यंत राेज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या चारपट झाली आहे. धारावीत कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त किरण दिघावकर सांगतात, धारावीत डिस्टन्सिंगचे पालन जवळपास अशक्य होते. यामुळे एकमेव पर्याय हा होता की वाट बघत बसण्यापेक्षा विषाणूचा मागोवा घेणे. आमचा पहिला हेतू मृत्यू रोखणे असल्याने अाम्ही स्क्रीनिंग आणि चाचणी वेगाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
धारावीच्या २.५ चौरस किमी परिसरात सुमारे ८.५० लाख नागरिक राहतात. एकेका शौचालयाचा वापर ८०-८० लोक करतात. यामुळे जवळपासचे क्लब आणि शाळांना आयसोलेशन आणि क्वॉरंटाइन केंद्रात रूपांतरित करण्यात आले. लॉकडाऊन आणि चाचणीचा परिणाम झाला.
रोज आढळणारे रुग्ण ६० वरून २० झाले, निम्म्याहून जास्त रुग्ण बरे
धारावीत रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ६० वरून कमी होऊन २० पर्यंत आली आहे. तसेच येथे दोन महिन्यांत झालेल्या एकूण ७७ मृत्यूंपैकी जूनमध्ये केवळ ६ झाले आहेत. मात्र, धारावीचे युद्ध सुरू आहे विषाणू शहर सोडून जात नाही तोपर्यंत ते सुरू राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.