आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धारावीचा आदर्श:खरंच आदर्श आहे कोरोनावर मात करणाऱ्या धारावीचा प्लॅन! डब्लूएचओकडून कौतुक झालेल्या धारावीत नेमके काय-काय केले...

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • ट्रिपल टी प्लॅन सर्वात प्रभावी, प्रत्येक झोपडीत स्क्रीनिंग, सार्वजनिक शौचलायलांवर लक्ष

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाविरुद्ध झालेल्या यशस्वी लढ्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कौतुक केले आहे. धारावीने कोरोनावर केलेली मात हे इतरांसाठी आदर्श उदाहरण आहे असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्या निमित्त धारावीने कोरोनावर नियंत्रण नेमके कसे मिळवले असा सवाल सर्वांकडून केला जात आहे. धारावीत परिस्थिती अतिशय वाईट होती. धारावीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2359 आहे. त्यातील केवळ 166 सक्रीय रुग्ण आहे. घनदाट वस्ती आणि बारीक गल्ल्या इत्यादीतून सोशल डिस्टन्सिंग अशक्य वाटत होती. तरीही धारावीत कोणत्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यात आली याबद्दल जाणून घेऊ.

ट्रिपल टी प्लॅन सर्वात प्रभावी

6 लाखांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाशी लढताना महानगरपालिकेने ट्रिपल टी अर्थात ट्रेस-टेस्ट-ट्रीटमेंट या सूत्राचे पालन केले. याचाच वापर करून दक्षिण कोरियाने कोरोनावर मात केली आहे.

चेस द व्हायरस अॅक्शन प्लॅन

धारावी मुंबईच्या जी-नॉर्थ वार्डात येते. येथील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितल्याप्रमाणे, धारावीसाठी चेस द व्हायरस नावाचे अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आले. यामध्ये घनदाट वस्तीमध्ये स्क्रीनिंग करण्यात आली. यात फीव्हर क्विनिकची स्थापना झाली. तसेच सर्वेक्षण आणि काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले.

लोकांना शोधून क्वारंटाइन केले

बीएमसीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी येथील प्रत्येक झोपडीत जाउन लोकांची थर्मल स्क्रीनिंग केली. लक्षणे दिसून येताच लोकांना आयसोलेट करण्यात आले आणि त्या सर्वांची चाचणी घेण्यात आली. शाळा, कॉलेजला क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आले. या ठिकाणी सातत्याने डॉक्टर, नर्स आणि तीन वेळचे जेवण अशी व्यवस्था करून देण्यात आली. आतापर्यंत जवळपास 12 हजार लोकांना इंस्टिट्युशनल क्वारंटाइन करून घेण्यात आले. यासाठी 12 क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आले होते. रुग्णांची संख्या कमी होत असताना त्यापैकी 3 सेंटर बंद करण्यात आले.
2450 लोकांची टीम तैनात

धारावीसाठी बीएमसीने 2450 लोकांची टीम तैनात केली होती. ज्यांनी लोकांना ट्रेस करून त्यांच्या चाचण्या घेतल्या आणि त्यांच्यावर उपचार देखील केले. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. यासह 250 लोकांच्या कंत्राटी मेडिकल टीमने सुद्धा या ठिकाणी खूप मदत केली. यातील बहुतांश कर्मचारी स्क्रीनिंग आणि ट्रेसिंगचे काम करत होते.

खासगी आणि सार्वजनिक शौचालयांवर लक्ष

संक्रमण वाढण्याचा मोठा धोका सार्वजनिक शौचालय मानले जाते. धारावीतील 80% लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. या ठिकाणी जवळपास 450 पक्के शौचालय आहेत. बीएमसीचे आरोग्य कर्मचारी हे सार्वजनिक शौचालय दिवसातून 5 ते 6 वेळा स्वच्छ करतात. प्रत्येक टॉयलेटमध्ये हँडवॉश ठेवण्यात आले. खासगी कंपन्यांना सहभागी करून या ठिकाणी मोफत हात धुण्याचे साबण वाटप करण्यात आले.

आधी रोज 100 नवे रुग्ण आता दैनंदिन केवळ 2 रुग्ण

एक एप्रिल रोजी धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर आठवडाभरात 100 नवीन रुग्ण सापडले. हळू-हळू रुग्णांची संख्या वाढली आणि दैनंदिन 100 रुग्णांची यादी समोर येत गेली. परंतु, वरील सर्व उपाययोजना केल्यानंतर आता धारावीत दैनंदिन रुग्णांची संख्या 2 वर आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser