आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चिंता:कोरोनामुळे धारावीची बदनामी; 50 टक्के दुकाने झाली रिकामी, एक्स्पोर्ट हबवरून रिपोर्ट

विनोद यादव | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत दिवाळीला भासू शकतो दिव्यांचा तुटवडा

मी सकाळी ९ वाजताच दुकानात आलो आहे. संध्याकाळचे ७ वाजले आहेत. मात्र, सकाळपासून एकही ग्राहक आलेला नाही. धारावीतील चामड्यासह इतर वस्तूंची आयात जवळपास ठप्प झाली आहे. धारावी लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सोनावणे यांनी ही वस्तुस्थिती सांगितली. ते सांगतात, कोरोनामुळे धारावीची बदनामी झाल्याने ग्राहकांनीही पाठ फिरवली आहे, तर ५० टक्के दुकानदारांनी दुकाने रिकामी केली आहेत. बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने दुकानदार भाडेही भरू शकलेले नाहीत. येथे केवळ औषध निर्माता कंपन्या आणि थोड्याफार प्रमाणात भेटवस्तूंची मागणी होत आहे. हब ऑफ इंटरनॅशनल एक्स्पोर्ट अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनामुळे लोक यायलाही घाबरत आहेत. येथे आतापर्यंत २७०० हून जास्त रुग्ण आढळले आहेत. मात्र, सध्या सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. यानंतरही ग्राहक येण्यास धास्तावत आहेत.

येथील कुंभारवाडा मातीच्या वस्तूंसाठी मुंबईत प्रसिद्ध आहे. येथील प्रजापती सहकारी उत्पादक संघाचे अध्यक्ष कमलेश चित्रोडांनी सांगितले, नवरात्री ते दिवाळीपर्यंत आमचे दोन लाख दिवे विकले जातात. यंदा तेवढे तयारही झालेले नाहीत. कोरोनामुळे मजुरांचीही कमतरता आहे. गोदामात फिजिकल डिस्टन्सिंगमुळे मजूर एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांना आरोग्यासह दंडाचीही भीती आहे. धारावीमध्ये मातीचे दिवे बनवण्याचे काम किमान दोन ते तीन महिन्यांआधी सुरू व्हायचे. मात्र, यंदा आम्ही फक्त ५० टक्के दिवे बनवू शकू.