आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागेश्वर बाबा यांच्याविरोधात मुंबईत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. साईबाबांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या युवासेनेने ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करत बागेश्वर बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. बागेश्वर बाबा हे साई भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भावना दुखावल्याचा आरोप
शिवसेनेचे (ठाकरे गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांबद्दल बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, "साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही." दरम्यान, बागेश्वर बाबा यांचा 25 ते 31 मार्चदरम्यान मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी साईबाबांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आपले परात्पर गुरू शंकराचार्यांनी कधीच साईबाबांना देवाचा दर्जा दिला नसल्याचेही ते म्हणाले होते.
भावना दुखवायच्या नाहीत
पुढे बागेश्वर बाबा असेही म्हणाले होते, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणे खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत, फकिर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही.
संबंधित वृत्त
पुन्हा मुक्ताफळे:'गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही', शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांबद्दल बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.