आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेला आव्हान देणारा धूत यांचा अर्ज फेटाळला:घरचे जेवण, अंथरुणास  कोचर दांपत्याला नकार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआयसीआय कर्ज घोटाळा प्रकरणात झालेली अटक बेकायदा असून आपली त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी व्हिडिअोकाॅन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांची याचिका विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्याचप्रमाणे घरचे जेवण, अंथरुण, पांघरुण, चादरी, खुर्च्यांची मागणी करणारी कोचर दांपत्याची याचिकाही सीबीआय न्यायालयाने फेटाळली आहे. सुमारे ३ हजार कोटींच्या कर्ज व लाच प्रकरणात धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या बडतर्फ सीईओ चंदा कोचर,त्यांचे पती दीपक कोचर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. धूत यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले होते. कोचर दांपत्याच्या अटकेनंतर तपास अधिकारी दबावाखाली आल्याने धूत यांना अटक करण्यात आली. धूत हे माफीचे साक्षीदार होतील, असा कोचर दांपत्याला संशय होता, असा युक्तिवाद धूत यांच्या वकिलांनी केला होता. दरम्यान, वैद्यकीय सल्ला घेऊन कोचर दांपत्याला जेवण देण्याचे आदेश न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...