आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thaceray Masjid Speacker | Dial 100 As Soon As The Bell Rings At The Mosque: Raj Thackeray; 'Divya Marathi' Verification: No Complaint Yet

‘दिव्य मराठी’ पडताळणी:मशिदीवरील भोंगा वाजताच 100 डायल करा; अद्याप एकही तक्रार नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२) महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पत्र लिहिले आहे. हेच पत्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पत्रात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. भोंगे हटवा हे आंदोलन थांबलेले नाही. आपण सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनात आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार असायलाच हवा. एक सुजाण नागरिक म्हणून आपण पुढील सूचनांचे पालन केले तर भोंग्यांचा हा प्रश्न कायमचा निकाली काढता येईल, असा दावा राज यांनी आपल्या पत्रात केला आहे. नागरिकांना पत्र, तक्रारीचे तीन पर्याय

१.सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांसाठी सांगितलेली मर्यादा जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरइतकी) इतकाच असावा. जिथे जिथे या नियमाचं पालन होत नसेल तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.

२.लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वत:च्या मोबाइलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतात माहिती देऊ शकता. पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वत:कडे ठेवायला विसरू नका.

३.सर्वात महत्त्वाचं - माझे हे पत्र तुमच्या घरी घेऊन येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकाचं नाव, मोबाइल क्रमांक तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवा.

४ मेला आवाहन : १० जिल्ह्यात तक्रार नाही
कायदेशीर मर्यादेपलीकडे मशिदीवरील भोंग्यंविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यानी ४ मेच्या सभेत जाहीर केले होते. त्यानंतर गेल्या महिनाभरात राज्यात भोंग्यांविरोधात किती तक्रारी आल्या याची पडताळणी ‘ दिव्य मराठी’ने राज्यातील १० शहरांमध्ये आणि १० जिल्ह्यांमध्ये केली. त्यापैकी एकाही शहर अथवा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये भोंग्याविरोधात तक्रार दाखल झाली नसल्याचे पुढे आले आहे.

बातम्या आणखी आहेत...