आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मनसे अध्यक्षांवर कारवाई:मास्क वापरला नाही, बोटीवर धूम्रपानही केले; राज ठाकरे यांना 1 हजार रुपये दंड

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलिबागला जाताना रो-रो बोटीतली घटना

मुंबई ते अलिबाग रो-रो बोटीने प्रवास करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवासादरम्यान १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रो-रो बोट प्रवासादरम्यान धूम्रपान केल्याने राज यांना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) हा दंड ठोठावण्यात आला.

राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत या रो-रो बोटीतून मागच्या आठवड्यात प्रवासाचा आनंद लुटला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मास्क परिधान करणे सध्या आवश्यक आहे. तसेच बोटीत धूम्रपान निषिद्ध आहे. मात्र, राज ठाकरे यांनी बोटीच्या मोकळ्या भागात येत अनवधानाने सिगारेट शिलगावली. ही गोष्ट बोटीवरील कर्मचाऱ्याच्या नजरेत येताच त्याने ही बाब राज यांच्या लक्षात आणून दिली. आपली चूक लक्षात येताच राज यांनी दिलगिरी व्यक्त करून दंड भरला. दरम्यान, असा काही प्रकार घडला नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.